DHW – Dattatray Hosiery Works

DHW – Dattatray Hosiery Works

DHW: 1962 पासून चालत आलेला यशस्वी कौटुंबिक व्यवसाय

आजोबांनी रुजवले, वडिलांनी वाढवले, काकांनी हातभार लावला आणि नातवाने सजवले…
असा हा तीन पिढ्यांचा व्यवसाय!

तुम्हाला स्थानिक यशोगाथा वाचायला आवडतील ना? जर वाचाल तर कदाचित तुम्हाला प्रेरणा मिळेल. परदेशातील मोठ्या उद्योजकांच्या गोष्टी ऐकायच्या सोडून कधीतरी आपल्या मातीतील व्यवसायाचा आढावा घ्या.

### DHW म्हणजे दत्तात्रय होजियरी वर्क्स
1962 साली आजोबांनी, दत्तात्रय यशवंत भागवत, सॉक्सच्या व्यवसायाची सुरुवात केली.
त्यांनी वडिलांच्या नावावरून या व्यवसायाला नाव दिलं, दत्तात्रय होजियरी वर्क्स.
प्रारंभी हाताने चालवायच्या एका मशीनपासून व्यवसाय सुरू झाला. त्या काळात एका दिवसात फक्त तीन डझन सॉक्स तयार होत असत.

### प्रगतीची पावले
जसा काळ बदलला, तसे विजेवर चालणाऱ्या मशीन आल्या, आणि आमच्या व्यवसायानेही प्रगती केली. हळूहळू आम्ही एकेक मशीन घेत गेलो, आणि आता 13 आधुनिक मशीनसह आमचा व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू आहे.

### दुसरी आणि तिसरी पिढी
आजोबांनी सुरू केलेला व्यवसाय माझे वडील, किरण यशवंत भागवत, आणि काका, प्रकाश यशवंत भागवत, यांनी पुढे नेला.
आता आम्ही, म्हणजे मी आणि माझा भाऊ राजस किरण भागवत, या व्यवसायाची जबाबदारी घेतली आहे.
आम्ही शाळेत असल्यापासूनच दर रविवारी व्यवसायात काम करायला येत होतो. “नोकरी न करता व्यवसाय करायचा,” हे ठरवल्यामुळे व्यवसायाची गोडी लागली.

आम्ही तिसऱ्या पिढीत सॉक्सच्या व्यवसायाबरोबरच सर्जिकल उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे.

### उत्पादनांचे प्रकार

#### सॉक्स
– जेन्ट्स सॉक्स (अँकल)
– जेन्ट्स सॉक्स (फुल)
– लेडीज सॉक्स (अंगठा)
– लेडीज सॉक्स (अँकल)

#### सर्जिकल उत्पादने
– अँकल कॅप
– एल्बो कॅप
– निकॅप

### उपलब्धता
सर्व उत्पादने सातारामध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
तसेच, तुम्ही ऑर्डर दिल्यास ती कुरिअरद्वारे तुमच्या घरी पोहोचवली जातील.

### आमचा विश्वास
आजही तिसरी पिढी हा व्यवसाय आनंदाने चालवत आहे. हा व्यवसाय आमच्या कौटुंबिक वारशाचा भाग आहे, आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे.

Location

415002,Satara
error: Content is protected !!