World Of Snakes at Lalit Club House
- August 16, 2023
- ViralAds.co.in
- (0)
- Blog
🔊🔊🔊 🪱 येत्या महिन्यात नागपंचमी आहे. हा सण आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. परंतु त्यामुळे सर्प सृष्टीचं आणि पर्यायाने या संपूर्ण विश्वाचं खूप मोठं नुकसान होतंय, याची कल्पना आपल्याला आहे का?
नेमकं याच विषयावर आपल्याशी बोलण्यासाठी येत आहेत, पुण्याच्या कात्रज सर्पोद्यान, येथील भारतीय सर्प विज्ञान संस्थेचेे विश्वस्त श्रीराम शिंदे.
स्लाइड्सच्या माध्यमातून विषारी तसंच बिनविषारी सापांची ओळख करून देण्याबरोबरच सापांविषयीच्या अंधश्रद्धा, गैरसमज, सर्पदंश कसे टाळावेत? चुकून तो झाल्यास काय करावे?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यंदाची नागपंचमी पर्यावरण पूरक पद्धतीने कशी साजरी करावी?
या सर्व बाबींवर ते प्रकाश टाकणार आहेत,
ललित सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये
रविवार 20 ऑगस्ट रोजी
सकाळी 10.30 वाजता.
सांस्कृतिक समिती, ललित सहकारी गृहरचना संस्था
आपणही या इतरांनाही सांगा…
Leave a Comment